जिल्हा माहिती कार्यालयात ‘दर्पण दिन’ साजरा
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):- येथील जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा करण्यात आला. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या नियकालिकाला सुरुवात केली त्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास, पत्रकार अब्दुल गनी शेख, शेख सईद, शेख अनवर, नदीम सौदागर, कासलिवाल, एम.ए. शेख, जाकिर सिद्दिकी, असलम खान तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी श्रीमती मंजुश्री मुळे, अनिल परदेशी, सतिष वाबळे, सुभाष पवार,उद्धव शंके, चंद्रकला दाभाडे, चंद्रकांत लोखंडे, संजय दीक्षित आदी उपस्थित होते.
०००००

Comments
Post a Comment