महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण

 


छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवस कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमास बुधवार दि.८ रोजी सुरुवात होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे यांनी केले आहे.

            या प्रशिक्षणात व्यवसाय मार्गदर्शन तसेच या क्षेत्रातील विविध संधी, बाजारपेठ पाहणी, शासकीय योजनांची संपूर्ण माहिती देण्यात येईल. या प्रशिक्षणात तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन)चे प्रकार, त्यामधील उद्योग संधी, वर्किंग प्रिन्सिपल, व्हेजिटेबल कटिंग मशीन, ग्राइंडर मशीन, पॅकिंग, पिलिंग मशीन (साल काढण्याची मशीन) तसेच प्रोसेस लाईन, सेटअप मशीन सिलेक्शन, कच्चामाल, बाजारपेठ, निर्यात क्षेत्रात उद्योग संधी, मालाची प्रत इत्यादी. तसेच प्रात्यक्षिक मध्ये-मेथी पावडर, पालक पावडर, हिरवी मिरची पावडर, आले लसूण पावडर, कढीपत्ता,पुदिना पावडर, बनाना पावडर, चिकू फ्लेक्स, पायनॅपल फ्लेक्स. रेडी टू कुक मध्ये - मिसळ, उसळ, राजमा छोले या सर्व विषयांवर विषयांवर तज्ज्ञ व्याख्यात्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या संधीचा लाभ युवक, युवती व महिलांनी घ्यावा तसेच उद्योग करण्याची प्रबळ इच्छा असणाऱ्यांनी या प्रशिक्षणात  सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक सौ.प्रतिभा निमकर यांनी केले आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी सौ.शुभांगी झाडे मोबाईल क्रमांक ७३८७७३४२६६, सौ.उषा वानखेडे मोबाईल क्रमांक ८४८४०२११६२ यांच्याशी व प्रत्यक्ष भेटीसाठी मुख्यालय महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एम सी इ डी अ ३८ एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड येथे संपर्क साधावा.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा