शासकीय आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

 




छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतिगृह येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन (रविवार दि.२) करण्यात आले. या संमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांद्वारे आदिवासी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले.

            आदिवासी चित्रकला, नृत्य, भाषण, सामान्य ज्ञान, वक्तृत्व स्पर्धा यासह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, क्रिकेट अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

            बक्षिस वितरण सोहळ्यास साई महाशब्दे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले, ‘स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि शिक्षणासोबत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करा’.

            स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यशस्वी आयोजनासाठी गृहप्रमुख कुलकर्णी मॅडम, आखरे मॅडम, रामटेके मॅडम, राऊत मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा