वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयोजीत होते. या कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता धुळे सोलापुर महामार्ग व खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरील जड वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-
१.
छत्रपती
संभाजीनगरकडून कन्नड, वेरुळ , खुलताबाद, दौलताबादकडे जाणारी जड वाहतुक छत्रपती
संभाजीनगर –शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी- कसाबखेडा फाटा-वेरुळ बायपास मार्गे-
कन्नडकडे जाईल.
२.
कन्नडकडून
–वेरुळ, खुल्ताबाद, दौलताबाद व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतुक कन्नड-वेरुळ
बायपास- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती
संभाजीनगरकडे येतील.
३.
फुलंब्रीकडून-
सुलतानपूर, खुलताबाद, वेरुळकडे जाणारी जड वाहतुक
फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी – कसाबखेडा फाटा-
वेरुळ बायपास मार्गे कन्नडकडे जातील.
हे आदेश दि.२५
फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत लागू राहतील. या कालावधीत खुलताबाद ते वेरुळ या
परिसरात जड वाहतुक बंद ठेवण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
०००००
Comments
Post a Comment