सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-  समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्यकरणारे समाजसेवक यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी विविधपुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्या अनुषंगाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात

देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पदमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारासाठी संबंधीत व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडुन शनिवार दि.१५ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या पुरस्काराची माहिती व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.goi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुक व्यक्ती व संस्थांनी दि.१५ पर्यंत आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह सहायक आयुक्त, समाजकल्याण, छत्रपती संभाजीनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपूरा, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात दाखल करावेत असे आवाहन सहायक आयुक्त प्रदीप भोगले  यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा