पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून ४७८ उमेदवारांची निवड

 छत्रपती संभाजीनगर,दि.१६(जिमाका)- कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे आयोजीत  पंडीत दीनदयाल उपाध्याय  रोजगार मेळाव्यात ४७९ उमेदवारांची निवड करण्यात आली, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. ३३१ जणांची प्राथमिक तर १४८ जणांची अंतिम निवड झाली आहे.

एम.आय.डी.सी वाळूज येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, हायटेक महाविद्यालय परिसर येथे रोजगार मेळावा  आयोजित करण्यात आला होता. उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय श्रीमती विद्या शितोळे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.सहायक संचालक, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार श्रीमती ऋजुता बनकर यांनी प्रधानमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेची माहिती दिली व उमेदवारांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.मसिआचे अर्जून गायकवाड,भारतीय ग्रामीण पुनर्रचना या संस्थेचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात वॉकहार्ड रिसर्च सेंटर,  रत्नप्रभा मोटर्स,  फोर्ब्स प्रेसीशन टूल्स ॲड मशिन पार्ट्स., लिभेर अप्लायंन्सेस प्रा.लि., अलंकार ग्रूप, ग्रीव्हज कॉटन प्रा.लि., वोकहार्डखार्ड लि., पॅरासन मशीनरी इं. प्रा.लि., नवभारत फर्टीलायझर्स लि, एक्सेल प्लेसमेंट, पगारीया ऑटो, देवगीरी नागरी सहकारी बँक लि., अजंता फार्मा लि., सवेरा फार्मा, मायलन लॅबोरेटरी लि. ओम साई मॅन पावर,स्टरलाईइ टेक्नॉलॉजी, लुपीन ली., आमाधने प्रा.लि. इंडूरंन्स ली., एक्सीडी इंडिया ली.    इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित नियोक्त्यांनी सहभाग दर्शवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या रोजगार मेळाव्यातून ३३१ उमेदवारांची प्राथमिक व १४८ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली,असे कळविण्यात आले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा