डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना;प्रस्ताव मागविले

 छत्रपती संभाजीनगर दि.१७(जिमाका) – अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांनी दि.२२ पर्यंत आपले  प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे. प्रस्ताव दाखल  करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र मदरसा चालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.२२ पर्यंत सादर करावे, विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा