सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी

 





 छत्रपती संभाजीनगर, दि.१९(जिमाका)- शासनातर्फे मुंबईत इंदू मिल येथे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुट उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. हा पुतळा बनविण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारयांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज या कार्यशाळेस भेट देऊन पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या समवेत शिल्पकार राम सुतार, त्यांचे पुत्र, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, विशेष कार्य अधिकारी अभय देशमुख इ. उपस्थित होते. तसेच सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांनी पुतळ्याच्या कामाची गुणवत्ता, प्रगती, इत्यादींचा आढावा घेऊन राम सुतार आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा