जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांच्या क्षेत्रीय कार्यालयांना भेटी

 



छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- क्षेत्रीय कार्यालयांसाठी १०० दिवसांकरीता ७ कलमी कृती आराखडा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दि.१० व मंगळवार दि.११ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी गंगापूर तालुक्यातील आरोग्य केंद्र व तालुकास्तरीय कार्यालयांना भेटी दिल्या. त्यात जि.प. बांध उपविभाग प्रा.आ.केंद्र .जिकठाण, शेंदूरवादा, लासूर स्टेशन, पशुवैद्यकीय दवाखाना गंगापुर व शेंदूरवाडा प्रा.आ.केंद्र. सि. वडगांव, वालुज, भेंडाळा, पशुवैद्यकीय दवाखाना तुर्काबाद यांचा समावेश होता. त्यांचेसमवेत जिल्हा आयुष अधिकारी डॉ. शेख शकील, चंद्रभान.डी. बनसोडे, अनिल गाढे, विजय काटे, कनिष्ठ अभियंता उत्तम पवार, भारत कांबळे, विशाल ताठे, बी.एस. थोरात आदी उपस्थित होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा