मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन व स्वागत






छत्रपती संभाजीनगर,दि.५(जिमाका)-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दुपारी सव्वा १२ वा. सुमारास येथील विमानतळावर आगमन झाले.त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि  कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील,पर्यावरण आणि हवामान बदल ,पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे हे ही होते.

             प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आ.अनुराधाताई चव्हाण तसेच मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर आष्टी येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता हेलिकॉप्टर ने रवाना झाले.


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा