शिवजयंतीनिमित्त आज (दि.१९) ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. यानिमित्त शहरात बुधवार दि.१९ रोजी सकाळी साडेसात वा. या पदयात्रेचा आरंभ होईल. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करुन या पदयात्रेस सुरुवात होईल.त्यानंतर पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ होईल.

            या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे,राज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खा. संदिपान भुमरे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतिष चव्हाण, विधानसभा सदस्य प्रदीप जयस्वाल, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्थित राहणार आहेत.

            या पदयात्रेत क्रीडा ज्योत विद्यार्थी नेतील. ही ज्योत यात्रेच्या समारोपानंतर विभागीय क्रीडा संकुलात नेण्यात येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिवकालिन वेशभुषेत व शिवचरित्रातील व्यक्तिरेखांच्या वेशभुषांमध्ये किंवा शालेय गणवेशात सहभागी होतील. क्रांती चौक येथे तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत इ. सादरीकरण होणार आहे. या पदयात्रेत  नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय छात्रसेना,  तसेच शहरातील शाळा महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सहभागाचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा