शिधापत्रिकाधारकांचे आधार प्रमाणिकरण,ई- केवायसी अनिवार्य जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन;२८ फेब्रुवारी पर्यंत मुदत
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्यासाठी
गावोगावी शिबिरे आयोजीत केले जात आहेत. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व
लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड
दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण
ई-केवायसी करावयाचे आहे. ही प्रक्रिया दि.२८ फेब्रुवारी पर्यंत करावयाची आहे.
ई-केवायसी केले नाही तर त्यानंतर धान्य वितरण बंद होऊ शकते, याची
नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा. सर्व लाभार्थी
व रास्तभाव धान्य दुकानदार यांनी दि.२८ पर्यंत आपले ई- केवायसी पुर्ण करावे असे
आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment