अल्पवयीन मुलगी बेपत्ता

छत्रपती संभाजीनगर,दि.१३(जिमाका)- लिंबेजळगाव येथील विटभट्टीवर काम करणाऱ्या दाम्पत्याची मुलगी रुपाली संजय गायकवाड (वय १५ वर्षे) ही बेपत्ता झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत वाळूज पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली की,  दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सायं. साडेसहा वा. मंगल संजय गायकवाड मुळ गाव नेवासा जि. अहमदनगर यांची मुलगी पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेली ती नंतर परतली नाही. याबाबत तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. म्हणून तक्रार नोंदविण्यात आली. रुपाली हिचे वर्णन खालील प्रमाणे- रंग काळा सावळा, केस काळे व लांबट, बांधा सडपातळ, उंची साडेचार फुट,अंगात लाल रंगाचा टॉप, हिरव्या रंगाची बरमुडा पॅंट, गुलाबी ओढणी, पायात लाल रंगाची चप्पल, मराठी व अहिराणी भाषा बोलते. पोलीस उपनिरीक्षक एस.आर. दिलवाले हे अधिक तपास करीत आहेत.

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा