‘सुरक्षित इंटरनेट दिवस’:जिल्हाधिकारी कार्यालयात मार्गदर्शन; इंटरनेट वापरा मात्र सुरक्षितपणे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 




छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-इंटरनेट आपल्या जीवनाचा आणि कामकाजाचा अविभाज्य भाग बनला आहे. तथापि याचा वापर करतांना तो अधिक किफायतशीरपणे तर करावयाचा आहेच शिवाय तो अधिक सुरक्षितही करावयाचा आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

‘सुरक्षित इंटरनेट दिवस’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला. यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांना सुरक्षित इंटरनेट वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल थोरात तसेच अन्य अधिकारी विभागप्रमुख उपस्थित होते.

अनिल थोरात यांनी यावेळी उपस्थितांना सुरक्षित इंटरनेट वापर, मोबाईल वापर याविषयी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग असलेला ॲनड्रॉइड मोबाईल व त्यावर सर्वस्वी अवलंबून असेलेले रोजची कामे, संपर्क, मेसेज, वित्तीय व्यवहार व इतर ॲप यांच्या वापराबाबत आपण पूर्ण माहिती करुन घेणे आवश्यक आहे. या सुविधांना लागणारे इंटरनेट डाटा, ही सुविधा पुरविणारे पुरवठादार, मोबाईलचे फायदे व तोटे याबाअत माहिती असणे आवश्यक असून त्या वापराबाबत अधिक खबरदारी व गोपनियता बाळगणे आवश्यक आहे. आपले युजर आयडी, पासवर्ड, बॅंक व्यवहार करतांना येणारे ओटीपी याबाबत कुणालाही सांगू नये. तसेच फसव्या मेसेजेस पासून सावध रहावे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, इंटरनेट , मोबाईल इ. वापराची गरज अत्यावश्यकता वाटत असली तरी त्याबाबत पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. विविध पोर्टल्स, वेबसाईट्स, बॅंकींग वेबसाईट्स, युपीआय ॲप बाबत माहिती करुन घेणे, खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा