जिल्ह्यात ११ तूर खरेदी केंद्र कार्यान्वित

 छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- आधारभूत दरानुसार महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) मार्फत  तुर खरेदीसाठी जिल्ह्यात ११ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तूर खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या पिकाची नोंदणी करुन शेतमाल विक्रीसाठी खरेदी केंद्रावर न्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी केले आहे.जिल्ह्यात तूर खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पाचोड, शिवना, विहामांडवा अशा ११ ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. तुर खरेदीकरीता शेतकरी नोंदणी २४ जानेवारीपासून करण्यात येत असून प्रत्यक्षात तूर खरेदी  १३ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. खरेदी १३ मे पर्यंत सुरु राहणार आहे. तरी सर्व शेतकर बांधवांनी आपला सातबारा उतारा, पीक पेरा, आधारकार्ड व बॅंक पासबुक घेऊन जावे आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी त्यानंतर एसएमएस प्रप्त झाल्यावर शेतमाल खरेदीकेंद्रावर न्यावा,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही.यु. राठोड यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा