राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रम, सामंजस्य करारासाठी आवाहन
छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ साठी काचबिंदू व रेटिना संबंधित शल्यचिकित्सकांसोबत (व्हिटीरोरेटिनल सर्जन) सामंजस्य करार करावयाचा आहे.त्यासाठी शैक्षणिक अर्हता एमस/ डिएनबी(ऑपथॅल्मॉलॉजी) व सर्जरीसाठी सक्षम असणाऱ्याशी सामंजस्य करार करण्यात येईल. प्रति रुग्ण १० हजा रुपये शुल्क अदा करण्यात येईल. इच्छुक व्हिटीरोरेटिनल सर्जन यांनी आपले शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, मागील तीन वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र व १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर द्यावयाचे हमी पत्र जिल्हा शल्य चिकित्स्क कार्यालयास दि.२६ पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment