दि.७ ते ९ सप्टेंबर जिल्ह्यात सुगम्य यात्रा
छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका)- दिव्यांग व्यक्तिंना सार्वजनिक ठिकाणी अडथळा विरहीत सुलभ वावर व्हावा या दृष्टीने केंद्र शासनाने दि.७ सप्टेंबर २०२५ पासून ‘सुगम्य यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सुगम्य यात्रेमध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी सक्षमीकरण विभाग (DEPWD) अंतर्गत कार्यरत असलेल्या सुगम्यता तज्ज्ञ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह दिव्यांग प्रवर्गातील व्यक्तिंचा समावेश असलेला गट जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी देणार आहे. प्रचलित सुगम्यतेच्या नियमावलीच्या अनुषंगाने शहरातील शासकीय इमारती, नगरपालिका, महानगरपालिका इमारती, सिनेमागृह, प्रेक्षणीय स्थळे, बाजार पेठ, धार्मिक स्थळे इ.ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणार आहे. इमारतीमधील सुगम्यतेविषयी दिव्यांग व्यक्तिंना येणाऱ्या अडचणीबाबत प्राथमिक माहिती करुन घेणार आहेत. ही सुगम्य यात्रा दि.७ ते ९ सप्टेंबर दरम्यान आयोजीत केलेली असून त्यासाठी ‘यस टू ॲक्सेस’(Yes to Access) या ॲप चा वापर केला जाणार आहे. संबंधित यंत्रणेने सुगम्य यात्रेत सहभागी होऊन विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी रावसाहेब चव्हाण यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment