केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा जिल्हादौरा

 छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल हे बुधवार दि.१९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

बुधवार दि.१९ रोजी सायं.६ वा. ४० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन, सायं.६ वा. ५० मिऩी. शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे प्रयाण, सायं.सव्वा सात वा. औरिक शेंद्रा औद्योगिक वसाहतीत भेट, रात्री ८ वा. स्थानिक, राज्य व राष्ट्रीयस्तरावरील उद्योग संघटना आणि चेंबर्स यांच्याशी संवाद, स्थळः- ऑरीक हॉल, शेंद्रा औद्योगिक वसाहत. रात्री १० वा. हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे मुक्काम व राखीव.

गुरुवार दि.२० रोजी सकाळी ९ वा. पत्रकार परिषद, स्थळः हॉटेल रामा इंटरनॅशनल. सकाळी साडेनऊ वा. वेरुळ लेण्यांकडे प्रयाण, सकाळी साडेदहा ते दुपारी १२ वेरुळ लेण्यांची पाहणी, दुपारी १२ वा. छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण, तेथून हेलिकॉप्टरने दिघी पोर्ट औद्योगिक वसाहतीकडे रवाना.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा