डिजीटल मार्केटींगवर मोफत प्रशिक्षण

 छत्रपती संभाजीनगर,दि.१६(जिमाका)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे दि.१७ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत डिजीटल मार्केटींग याविषयावर पाच दिवसीय मोफत प्रशिक्षणाचे  आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी उद्यम रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. डिजीटल मार्केटींग म्हणजे काय? डिजीटल मार्केटींग मधील रोजगार संधी, डिजीटल मार्केटींग चा वापर करून आपला उद्योग व्यवसाय कसा मोठा करू शकता, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्यांना या क्षेत्रात उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांनी सहभाग नोंदवावा. कार्यशाळेचे ठिकाण-मुख्य कार्यालय, अ -३८ एमआयडीसी एरिया, रेल्वे स्टेशन रोड जवळ, छत्रपती संभाजीनगर.अधिक माहितीसाठी सौ.आशा कुरवाडे (७८८८०७०४१९ ), कार्यक्रम समन्वयक एमसीईडी  यांच्याशी संपर्क करावा.असे आवाहन विभागीय अधिकारी सुदाम थोटे, जिल्हा प्रकल्प समन्वयक सौ. प्रतिभा निमकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा