उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा जिल्हादौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे शनिवार दि.२२ रोजी सपत्निक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२२ रोजी दुपारी दीड वा.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती
संभाजीनगर विमानतळ येथे आगमन. दुपारी एक
वा. ४० मि. नी. हेलिकॉप्टरने वेरुळकडे प्रयाण. दुपारी २ वा. वेरुळ येथे हेलिपॅडवर
आगमन, दुपारी २ ते सव्वा दोन दरम्यान घृष्णेश्वर मंदिर येथे पूजा व दर्शन, तेथून
वेरुळ लेणी येथे आगमन व कैलास लेणी पाहणी, पावणे तीन वा. वेरुळ हेलिपॅड येथे
मोटारीने आगमन व हेलिकॉप्टरने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती
संभाजीनगरकडे प्रयाण. दुपारी ३ वा. १० मि.नी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आगमन, दुपारी ३ वा. २० मि. नी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजीत ६५ व्या पदवीदान समारंभास उपस्थिती.
दुपारी साडेचार वा.एस.बी.कॉलेजकडे प्रयाण, दुपारी ४ वा. ४० मि. नी. एस.बी. कॉलेज येथे
संविधान जागृती व अमृत महोत्सव उद्घाटन
सोहळ्यास उपस्थिती.सायं. ५ वा. २५ मि. नी.३९१,टॉडलर स्कुलच्या बाजुला एन ३ सिडको
कडे प्रयाण व राखीव. सायं.५ वा. ५० मि. नी. विमानतळाकडे प्रयाण. व सायं. सहा वा.
शासकीय विमानाने दिल्लीकडे प्रयाण.
०००००
Comments
Post a Comment