शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हादौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे गुरुवार दि.६ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि.६ रोजी रात्री ११
वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दि.७ रोजी सकाळी ९ वा.
मनपा हद्दीतील विविध शाळांना भेटी. दु.१२ वा. सुभेदारी विश्रामगृह येथे आगमन व
राखीव, दुपारी १ वा. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक, स्थळः देवगिरी
महाविद्यालय, पद्मपुरा. सायं.साडेपाच वा.
उपक्रमशील शिक्षक याविषयावर चर्चासत्र, स्थळः देवगिरी महाविद्यालय, पद्मपुरा.
सायं. साडेसहा वा. मोटारीने सुभेदारी विश्रामगृहाकडे प्रयाण व राखीव. सायं. ७ वा.
पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक, रात्री साडेआठ वा. मोटारीने नाशिककडे प्रयाण.
०००००
Comments
Post a Comment