सार्वजनिक संस्थांच्या विश्वस्तांची मंगळवारी (दि.२५) कार्यशाळा
छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- धर्मादाय सह. आयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा धर्मादाय वकील संघ व महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणीकृत संस्था, मंदिर, न्यास, त्यांचे पदाधिकारी व संस्थांमधील विश्वस्तांसाठी मंगळवार दि.२५ रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही
कार्यशाळा मंगळवार दि.२५ रोजी रुक्मिणी सभागृह , एमजीएम कॅम्पस सिडको, एन ६ येथे
सकाळी १० ते दुपारी २ यावेळात होणार आहे. अध्यक्षस्थानी एमजीएम चे अध्यक्ष
अंकुशराव कदम हे राहणार असून कार्यशाळेस धर्मादाय सहआयुक्त आर.एस. पावसकर, आयकर
उउपायुक्त आर.एच.चव्हाण, आयकर अधिकारी श्रीहरी जोशी, सनदी लेखापाल संतोष गरुड,
मराठवाडा धर्मादाय वकील संघ ॲड. चंद्रकांत वरुडीकर, ॲड. विलास खरात आदी उपस्थित
राहणार आहेत. जिल्ह्यातील संस्था, मंदिर, न्यास व त्यांचे पदाधिकारी विश्वस्त
यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे असे आवाहन धर्मादाय उपायुक्त प्रणिता श्रीनिवार,
सहा. धर्मादाय आयुक्त पी.के.कापडे व मराठवाडा धर्मादाय वकील संघ यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment