प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण : प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे
छत्रपती संभाजीनगर,दि.१७(जिमाका)- विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावयाची आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजीत केले आहे. त्याचा यंत्रणेने लाभ घ्यावा. लोकांना परवडणारी घरे देण्याचे कार्य सुलभ व्हावे यासाठी हे प्रशिक्षण असून त्याचा लाभ घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे विभागस्तरीय-
शहर्स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ पायाभूत प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले. या प्रशिक्षणात
विभागातील ५ महानगरपालिका व ७५ नगरपालिकांचे मुख्याधिकारी, अभियंते, आवास योजनेशी संबंधित
तांत्रिक सल्लागार आदी सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित
होते. प्रशिक्षक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रविंद्र खेतले, राज्यस्तरीय प्रकल्प
व्यवस्थापन यंत्रणेचे वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन
यंत्रणेचे सल्लागार सारिम खान आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले
की, प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करतांना पहिल्या टप्प्यात ज्या अडचणी आल्या
त्यावर उपाययोजना शोधाव्या यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ
घ्यावा. तांत्रिक आणि प्रत्यक्ष अडचणींचे निराकरण
होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन घ्यावे. गोरगरिबांना स्वतःचे घर देण्यासाठी प्रत्येकाने
संवेदनशिल, गतिमान पद्धतीने काम करावे.
या
प्रशिक्षणात योजनेचा आढावा, प्रगती, निधी वितरण, अखर्चित निधी, जिओ टॅगिंग याबाबत रविंद्र
खेतले, प्रधानमंत्रीआवास योजनेची ध्येय्य, उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत मुकुल बापट
, प्रधानमंत्री आवास योजनेचे युनिफाईड पोर्टल, ऑनलाईन अर्ज भरणे याबाबत सारिम खान हे
मार्गदर्शन करणार आहेत.
०००००

.jpeg)


Comments
Post a Comment