सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी
छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- ५८ व्या शॉर्ट सर्व्हिस
कमिशन एन.सी.सी. स्पेशल प्रवेश योजना २०२५ अंतर्गत अधिकारी भरती होत
आहे. या भरतीसाठी उमेदवार एन.सी.सी. सी
प्रमाणपत्र धारक पदवीधर असावा. www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि.१४ फेब्रुवारी ते १५ मार्च
या दरम्यान अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी हेच संकेतस्थळ पहावे. सर्व एन.सी.सी. कॅडेट व युद्धात शहीद जवानांचे
अवलंबित यांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी
केले आहे.
०००००
Comments
Post a Comment