दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 




छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- दिव्यांगांचे जीवन सुकर व्हावे यासाठी अनेक योजना आहेत. तसेच त्यासाठी निधीही राखीव आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या राखीव निधीतून दिव्यांगांसाठीच्या योजना राबवून त्यांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

            जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जिल्हा व्यवस्थापन संघाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास हरबडे, डॉ प्रसाद कुलकर्णी, डॉ. महेश लड्डा यांच्यासह लखीचंद चव्हाण, महेश गोसावी, पुणे येथील  दिव्यांग सर्वेक्षण संस्थाचे संचालक उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले की,दिव्यांगांसाठी शासनाने  राखीव ठेवलेला निधी दिव्यांगांना विविध साधने उपलब्ध करून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी करावा.  प्राधान्याने त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात सर्व शासकीय विभागाने प्रयत्न करावे. वेळेत निधी खर्च करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा. दिव्यांगांचे सर्वेक्षण, त्याची वर्गवारी व त्यांच्या आवश्यक असलेल्या साधनांची सूची तयार करण्यात यावी. यावेळी शासकीय कार्यालयात असणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी स्वामी यांनी आढावा घेतला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा