अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

 छत्रपती संभाजीनगर दि.१७(जिमाका)- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या शाळांनी आपले प्रस्ताव दि.२२ फेब्ब्रुवारी पर्यंत सादर करावे असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे. प्रस्ताव सादर करण्याकरीता योजनेचा शासन निर्णय, अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी https://mdd.maharashtara.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पायाभुत सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा आता २ लाख रुपयांवरुन १० लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. यासंदर्भात यापूर्वी प्राप्त झालेले प्रस्ताव दि.१३ फेब्रुवारी २०२५ च्या परिपत्रकानुसार रद्द करण्यात आले आहेत. तरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अटी व शर्ती नुसार पात्र शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दि.२२ पर्यंत सादर करावे. विहित मुदतीनंतर प्राप्‍त  प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा