आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तालुकानिहाय बैठका
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत तालुकानिहाय तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठका आयोजीत करुन आजी व माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत,असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. बैठकांचे वेळापत्रक या प्रमाणे- दि.२५ रोजी सोयगाव, दु.१२ वा.तहसिल कार्यालय, सोयगाव, दि.२७ रोजी गंगापुर दु.१२ वा. गंगापूर तहसिल कार्यालय, दि.३ मार्च वैजापूर दु.१२ वा. वैजापूर तहसिल कार्यालय, दि.५ मार्च खुलताबाद, दु.१२ वा. खुलताबाद तहसिल कार्यालय, दि.१० मार्च कन्नड, दु.१२ वा. कन्नड तहसिल कार्यालय, दि.११ मार्च, फुलंब्री दु.१२ वा. फुलंब्री तहसिल कार्यालय, दि.२० मार्च छत्रपती संभाजीनगर दु.१२ वा. छत्रपती संभाजीनगर तहसिल कार्यालय.
संबंधित तालुक्यातील आजी व माजी सैनिकांनी आपल्या अडचणींसह
आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयात दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित रहावे,असे
आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
०२४०-२३७०३१३.
०००००
Comments
Post a Comment