राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा जिल्हादौरा
छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे शनिवार दि.२२ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार दि.२२ रोजी दुपारी साडेबारा वा. छत्रपती संभाजीनगर
येथे विमानाने आगमन व विमानतळावर राखीव.दुपारी दीड वा. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती संभाजीनगर विमानतळ
येथे आगमन प्रसंगी स्वागत समारंभास उपस्थिती. दुपारी एक वा. ४० मि. नी. उपराष्ट्रपती यांचे
समवेत हेलिकॉप्टरने वेरुळकडे प्रयाण. दुपारी २ वा. वेरुळ येथे हेलिपॅडवर आगमन,
दुपारी २ ते सव्वा दोन दरम्यान घृष्णेश्वर मंदिर येथे पूजा व दर्शन, तेथून वेरुळ
लेणी येथे आगमन व कैलास लेणी पाहणी, पावणे तीन वा. वेरुळ हेलिपॅड येथे मोटारीने
आगमन व हेलिकॉप्टरने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण. दुपारी ३ वा. १० मिऩी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती
संभाजीनगर येथे आगमन, दुपारी ३ वा. २० मि. नी. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजीत ६५ व्या पदवीदान समारंभास उपस्थिती. दुपारी
साडेचार वा.एस.बी.कॉलेजकडे प्रयाण, दुपारी ४ वा. ४० मि. नी. एस.बी. कॉलेज येथे संविधान
जागृती व अमृत महोत्सव उद्घाटन सोहळ्यास
उपस्थिती.सायं. ५ वा. २५ मि. नी.३९१,टॉडलर स्कुलच्या बाजुला एन ३ सिडको कडे प्रयाण
व राखीव. सायं.५ वा. ५० मि. नी. विमानतळाकडे प्रयाण. व सायं. सव्वा सहा वा. शासकीय
विमानाने मुंबईकडे प्रयाण.
००००००
Comments
Post a Comment