माजी सैनिकांना वृद्धावस्था निवृत्ती वेतनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- निवृत्ती वेतन लागू नसलेल्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांना सूचित             करण्यात येते की, ज्यांचे वय ६५ वर्षे किंवा जास्त झाले असेल त्यांना वृद्धावस्था निवृत्ती वेतन (PENURY GRANT)             साठी खाली नियमाप्रमाणे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

१.      निवृत्ती वेतन लागू नसलेले माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी ज्यांचे वय 65 वर्षे पूर्ण झाले असावे.

२.      रँक (हुद्दा) शिपाई ते हवालदार पर्यंत असावा.

निवृत्ती वेतन लागू नसलेल्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सर्व मूळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, येथे संपर्क करावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा