‘सिपेट’तर्फे कौशल्य विकास प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)- केंद्रीय पेट्रो रसायन अभियांत्रिकी व उद्योग संस्था व महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सहा महिने कालावधीचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे.मशिन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग, मशिन ऑपरेटर इंजेक्शन मोल्डिंग अशा दोन अभ्यासक्रमांसाठी इयत्ता १० वी उत्तीर्ण असलेले १८ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकता. हा अभ्यासक्रम ६ महिने कालावधीचा असून ३०० प्रशिक्षणार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्राचे रहिवासी असलेले इमाव, भज, विमाप्र अशा प्रवर्गातील नॉनक्रिमीलेयर संवर्गातील उमेदवार अर्ज करु शकता.  अर्जासोबत जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, इयत्ता १० वी १२ वी , आयटीआय, पदविका गुणपत्रक, प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो इ. सर्व कागदपत्रे जोडावी. अधिक माहितीसाठी व अर्ज जमा सादर करण्यासाठी केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), रसायन एवं पेट्रोकेमिकल्स विभाग, रसायन आणि उर्वरक मंत्रालय, भारत सरकार, प्लॉट नं. जे-३/२, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर. संपर्क- ०२४०-२४७८३१७, मोबाईल ९३२५६८७९१०, ९१४५६७५५८५  इमेल- aurangabad@cipet.gov.in

०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा