खुलताबाद तालुक्यात २५ ग्राम महसूल अधिकारी कार्यालये सुरु, गदाना येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

 



छत्रपती संभाजीनगर, दि.१८(जिमाका)- खुलताबाद तालुक्यात २५ ग्राम महसूल अधिकारी कार्यालये कार्यान्वित झाली आहेत. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज स्वतः गदाना येथील ग्राम महसूल कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार स्वरुप कंकाळ, मंडळ अधिकारी विजय चव्हाण यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सरपंच सविता चव्हाण व ग्राम महसूल अधिकारी सुनिता मंडळे  यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील सात कलमी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कार्यालये सज्ज करण्यात येत आहे. त्यादृष्टीने नागरिकांना योग्य सेवा देण्यासाठी ही कार्यालये सुसज्ज करण्यात येत आहेत.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा