गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा जिल्हा दौरा

 छत्रपती संभाजीनगर,दि.१३(जिमाका)- राज्याचे गृह(शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम हे जिल्हादौऱ्यावर आले आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी साडेसात वा. सुभेदारी विश्रामगृह येथून मोटारीने जालना कडे प्रयाण व सकाळी ११ वा. जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण, दुपारी १२ वा. छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व बैठक, स्थळः- पोलीस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर. दु.२ वा. शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्यांसह बैठक स्थळः- सुभेदारी विश्राम गृह, दुपारी साडेतीन वा. पत्रकारांसमवेत चर्चा, स्थळः- सुभेदारी विश्राम गृह, दुपारी ४ वा. ग्रामविकास व पंचायती राज अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी पावणे पाच वा. अन्न व नागरी पुरवठा व नागरी संरक्षण अधिकाऱ्यांसमवेत बैठक, सायं. साडेपाच वा. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक सर्व बैठकांचे स्थळः-सुभेदारी विश्रामगृह. सायं. पावणे सात वा. सुभेदारी विश्रामगृह येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कडे प्रयाण, सायं.७ वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील मैदानावर आगमन व सत्कार, रात्री ९ वा. १० मि. नी. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.  

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा