राष्ट्रीय लोकअदालतः6910 प्रकरणे सामोपचाराने निकाली
छत्रपती संभाजीनगर, दि.24 (जिमाका)- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे आयोजीत लोक अदालत शनिवार दि.22 रोजी पर पडली. या लोकअदालतीत 6910 प्रकरणे सामोपचाराने निकाली निघाले असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली फडणीस यांनी कळविले आहे.
लोक अदालतीच्या यशस्वतीतेसाठी अध्यक्ष
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती
विभा.पी.इंगळे, जिल्हा व सत्र न्यायाधीश, औरंगाबाद यांच्या मार्गदशनाखाली वेगवेगळे
शासकीय अधिकारी, विद्युत कंपनीचे
अधिकारी, वित्तीय संस्था,वकील व बँकेचे अधिकारी यांच्यासोबत बैठका घेण्यात आल्या होत्या.
लोकअदालतीच्या तयारीसाठी सर्व न्यायिक अधिकारी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय
संस्थाचे अधिकारी, विमा कंपनीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, भूसंपादन अधिकारी,
भूसंपादन संस्थेचे अधिकारी, मोबाईल कंपनीचे अधिकारी इ. सोबत
बैठका घेतल्या. बैठकीत प्रलंबित प्रकरणाचे संबंधित घटकांना लोकअदालतीमध्ये प्रकरण
तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार
अपघात, विद्युत चोरीची,धनादेश अनादर प्रकरणे, कौटुंबिक, भूसंपादन व तडजोडयुक्त
दिवाणी व फौजदारी प्रकरणे ठेवण्यात आलेली होती. वादपूर्व प्रकरणामध्ये युनियन बँक
ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल
बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक नॅशनल बँक, महारष्ट्र बँक, महाराष्अ्र ग्रामीण बँक, बँक ऑफ
इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युको बँक, एस.बी.आय.क्रेडीट,
आय.सी.आय.सी.आय.बँक, जॉन डिअर फायनान्स, उज्जीवन स्मॉल फायानान्स, व्होडाफोन, एल
ॲण्ड टी फायानन्स, धनी लोन्स फायनान्स, आय.सी.आय.सी.आय.बँक आणि मध्यस्थी
केंद्रामधील वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.
लोक अदालतीमध्ये एकूण 2490 प्रलंबित व
4420 दाखलपूर्व असे एकूण 6910 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रलंबित प्रकरणांमध्ये
एकूण रक्कम 59 कोटी 39 लक्ष 95 हजार 1 रुपये व वादपूर्व प्रकरणामध्ये एकूण रक्कम 32
कोटी 52 लक्ष 10 हजार 871 रुपये इतकी वसूली झाली. अशी एकूण रक्कम रु.91 कोटी 92
लक्ष 5 हजार 872 एवढ्या रक्कमेचा समावेश असलेली प्रकरणे लोक अदालतीमध्ये तडजोडीने
निकाली निघाली.
लोकअदालतीमध्ये जिल्ह्यात एकूण 32
पॅनल करण्यात आले होते. सर्व पॅनलच्या न्यायाधीशांनी त्यावर आपले योगदान दिले.
एकूण 6910 प्रकरणांमधील पक्षकरांना न्याय मिळाला. लोकअदालतीमध्ये जिल्हा वकील
संघाने सहभाग नोंदवला. तसेच अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा
व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा.पी.इंगळे,जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा
न्यायाधीश -1 डि.एच. केळुसकर यांच्या मार्गदर्शानालखा सचिव जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण श्रीमती वैशाली पी. फडणीस व न्यायीक अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष
परिश्रम घेतले.
०००००
Comments
Post a Comment