महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातर्फे दि.२२ रोजी लोकअदालत

 छत्रपती संभाजीनगर, दि.१२(जिमाका) :- महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, खंडपीठ औरंगाबाद (मॅट) येथे शनिवार, दि.२२ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. लोक अदालतमध्ये न्यायाधिकरणात प्रलंबित असलेली महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांची तडजोड पात्र सेवा विषयक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली काढल्यास शासकीय कर्मचारी व शासन यांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही, तसेच पक्षकारांना न्याय मिळेल. तरी शनिवार दि.२२ रोजी होणाऱ्या लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सर्व पक्षकारांनी, त्यांच्या वकीलांनी व संबंधितांनी सहकार्य करावे. लोक अदालतचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, औरंगाबाद खंडपीठ (मॅट) प्रभारी प्रबंधक संदीप ज्ञा.मुंडे यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा