कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे वतीने बुधवारी (दि.१२) पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व लाईट हाऊस कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. १२ रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा लाईट हाऊस कम्युनिटी सेंटर, धर्मविर संभाजी शाळेसमोर, एन-५ सिडको, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी साडेनऊ वाजेपासून होणार आहे.छत्रपती संभाजीनगर येथील नामांकीत कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
या रोजगार मेळाव्यात लिभेर अप्लायंन्सेस
प्रा.लि., रत्नप्रभा मोटर्स, नवभारत फर्टीलायझर्स
लि, एक्सेल प्लेसमेंट, औरंगाबाद ऑटो ॲन्सीलरी
प्रा.ली., बी जी ली -ईन ईलेक्ट्रीकल लि., ग्रीव्हज कॉटन प्रा.लि., रुचा इंजिनिअरिंग
प्रा.लि. पगारीया ऑटो, स्वतंत्र मायक्रोफीन प्रा.लि., स्ट्राविंग प्रॉस्पेरिटी फाऊंडेशन,
क्वेस कॉर्प लि. अलंकार इंजिनीअरींग इंक्युपमेंट प्रा.लि., लेबरनेट सर्व्हिसेस प्रा.लि.
इत्यादी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामांकित
नियोक्त्यांचे प्रतिनीधी ६३४ वेगवेगळ्या रिक्तपदांकरीता मुलाखती घेतील. यासाठी कोणत्याही
शाखेची पदवी, इंजिनीअरींग, डिप्लोमा, आय टी आय, एच. एस. सी., एस. एस. सी. उतीर्ण इत्यादी
पात्रताधारक उमेदवारांना विविध शैक्षणिक व व्यावसायीक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी
उपलब्ध होणार आहेत. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध रिक्तपदांना एम्प्लॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी
व पासवर्ड ने लॉग इन होऊन ऑनलाईन अप्लाय करावे आणि मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. संकेतस्थळावर
नोंदणी करताना अथवा रिक्तपदासाठी अप्लाय करताना काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी
क्रमांक ०२४०- २९५४८५९ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. बुधवार दि.१२ रोजी सकाळी
साडेनऊ वा. उपस्थित राहून पात्रतेप्रमाणे विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देवून रोजगार
संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
०००००

Comments
Post a Comment