'रिझर्व बँक ऑफ इंडिया'तर्फे गुरुवारी (दि.२०) 'टाऊन हॉल बैठक'

 छत्रपती संभाजीनगर,दि.१८(जिमाका)- रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे महाव्यवस्थापक सिबो नेखिनि यांच्या प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजगकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  गुरुवार दि.२० रोजी सकाळी १०  वाजता 'द फर्न रेसिडेन्सी', जळगाव रोड, सिडको, छत्रपती संभाजी नगर  येथे टाऊन हॉलबैठक आयोजित केली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या 'टाऊन हॉल' बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.

            सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग हे क्षेत्र देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असते. हे क्षेत्र ६.३ कोटींहून अधिक युनिट्ससह भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे आणि गतिमान क्षेत्र आहे. २० कोटींहून अधिक लोकांना रोजगार तसेच सर्वंकष उत्पादनात ३०% आणि निर्यातीत ४५ % हिस्सा हे क्षेत्र देत असते. तथापि, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राच्या पतपुरवठ्याबाबत काही अडथळे असतात त्याचे एक प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्राला विविध बँकिंग सुविधांबद्दल जागरूकता नसणे.

            त्याअनुषंगाने, भारतीय रिझर्व्ह बँक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राची जागरूकता आणि संस्थात्मक कर्जापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाययोजना आणि उपक्रम हाती घेत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या अशाच एका उपक्रमाचा भाग म्हणून सूक्ष्म आणि लघु उद्योजकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि त्याच्याशी निगडित क्लस्टर्सच्या केंद्रांवर 'टाऊन हॉल' बैठकांचा समावेश आहे.

            याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाव्यवस्थापक, रिझर्व बँक ऑफ इंडिया, मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजगकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी  गुरुवार दि.२० रोजी सकाळी १०  वाजता 'द फर्न रेसिडेन्सी', जळगाव रोड, सिडको, छत्रपती संभाजी नगर  येथे टाऊन हॉलबैठक आयोजित केली आहे.  या बैठकीस प्रमुख बँकांचे क्षेत्रिय व्यवस्थापक व बॅंक प्रतिनिधी सुद्धा उपस्थित असतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी या 'टाऊन हॉल' बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा