नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत; रविवारी (दि.२३) परीक्षा

 


छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका)- केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे.वय वर्षे १५ किंवा त्याहून अधिक वयोटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करुन असाक्षर व्यक्तींमध्ये महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करावयाची आहेत. उल्लास ॲप वर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दि.२३ रोजी सकाळी १० ते ५ यावेळात ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. असक्षार व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर स्वत:चे ओळखपत्रासह परीक्षेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी(योजना) श्रीमती ए.आर. भुमकर यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा