जागतिक वन दिन; सायकल रॅली,चित्रप्रदर्शनाद्वारे जनजागृती

 








छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)-जागतिक वन दिन सामाजिक वनीकरण विभाग आणि प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सायकल रॅली, चित्रप्रदर्शन , व्याख्यनांचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली.

            कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) श्रीमती सुवर्णा माने, मानद वन्यजीव रक्षक डॉ.किशोर पाठक, विभागीय वन अधिकारी (नियोजन) श्रीमती कल्पना टेमगिरे, विभागीय वन अधिकारी (मूल्यांकन) श्रीमती अश्विनी खोपडे, सहायक वनसंरक्षक श्रीमती आशा चव्हाणक सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती किर्ती जमदाडे-कोकाटे, सहायक वनसंरक्षक श्रीमती सोनिया शिंदे, वनपरिक्षेत्र  अधिकारी (सिल्लोड) एस.बी.तांबे, वनीकरण परिक्षेत्र अधिकारी (पैठण) जी.एस.सातपुते, वनीकरण परिक्षेत्र अधिकारी (शहर) अनिल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) सागर कुटे, तसेच संबंधित वनपाल, वनरक्षक इ. उपस्थित होते.

यानिमित्त सकाळी सात वा. वनसंरक्षक (प्रादेशिक) वनवृत्त, कार्यालयाच्या आवारापासून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सायकल संघटनेच्या वतीने ५० सायकल स्वारांनी त्यात सहभाग घेतला.  महात्मा फुले विद्यालय पद्मपूरा या शाळेतील ५० विद्यार्थी तसेच जनसहयोग, निसर्ग मित्र मंडळ या संस्थेचे भासद कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात विविधप्रकारचे पथनाट्य व मानवी साखळी तयार करुन वनांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने कार्यालयाच्या अवारात वन्यप्राणी, पक्षी विषयक निवडक चित्रांचे प्रदर्शन, उपक्रमात सहभागी प्रमाणपत्रांचे वाटप तसेच जनजागृतीपर कार्यशाळा इत्यादी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा