सोयगाव येथे आढावा बैठक; बालविवाह रोखण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):-बालविवाहासारखी समस्या ही सामाजिक समस्या असून ही समस्या सोडविण्यासाठी आपण स्वयंप्रेरणेने काम करणे आवश्यक आहे. त्या त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यांनी आपापल्या गावात होऊ घातलेले बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सोयगाव येथे दिले.

सोयगाव येथे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उपविभागीय अधिकारी  लतिफ पठाण, तहसिलदार मनिषा मेने, गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, सहा. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, प्रफुल्ल साबळे तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात आपण गाव तेथे वड हा उपक्रम राबविला. हा उपक्रम यंदाही राबवावयाचा असून एका गावात किमान १० वटवृक्ष लागवड करावे. जिल्ह्यात बालविवाह ही एक सामाजिक समस्या असून या समस्येचे निराकरण आपण स्वयंप्रेरणेने काम करुन करावे. कुपोषण, बालविवाह यासारख्या समस्या दुर्गम भागात जाणवतात. यासाठी स्थानिक गावातील प्रशासनाचे प्रतिनिधी असणारे तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी हे विवाह होण्याआधीच रोखावे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी. बालकामगार आपल्या क्षेत्रात विटभट्ट्यासारख्या ठिकाणी असल्यास त्याची माहिती देऊन कारवाई करावी,असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी अंगणवाडी आणि शाळांना झालेले नळजोडणी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, आरोग्य केंद्रांना भेटी, आपापल्या क्षेत्रातील कुपोषित बालकांना कुपोषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, जलयुक्त ग्राम, विहीर पुनर्भरण या उपक्रमांचा आढावा घेतला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा