कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

 छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- ज्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, अशा जिल्ह्यातील कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी वयाबाबतचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे  वरिष्ठ कोषागार कार्यालय येथे दि.३१ मार्च पूर्वी  सादर करावे, असे आवाहन सहाय्यक संचालक , वरिष्ठ कोषागार कार्यालय यांनी केले आहे.कोषागार कार्यालयाच्या सूचनेनुसार, या निवृत्तीवेतनधारकांनीअतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी आपले पॅन कार्ड, जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच शासकीय डॉक्टरांचा ८० वर्षे पूर्ण झाल्याचा वैद्यकीय दाखला, हे कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे. त्यानुसार आवश्यक कागदपत्रे दि. ३१ मार्च २०२५ पूर्वी पूर्वी जमा करावे.यासंबंधी अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा