धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाच्या सेवा ऑनलाईन
छत्रपती संभाजीनगर, दि.२५(जिमाका)- धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाने सन २०२४ मध्ये एकूण ८२३ बदल अर्ज व इतर न्यायिक प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रलंबित बदल अर्ज व इतर न्यायिक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे काम सुरू आहे . या कार्यालयातून देणार येणाऱ्या सर्व सेवा सुविधा ऑनलाईन उपलब्ध असून याचा फायदा घेण्याचे आवाहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. सन २०२४ मध्ये कार्यालयामध्ये ४६० नवीन संस्थांची नोंदणी केली आहे. ज्या संस्थांनी नोंदणीसाठी किंवा लेखापरीक्षणासाठी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना कार्यालयामध्ये चौकशीसाठी येण्याची आवश्यकता नाही. संस्थेच्या नोंदणी प्रस्तावांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिक आणि संस्थांनी धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावरील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन धर्मादाय सह आयुक्त रा. स. पावसकर यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment