पैठण येथे आज (दि.२०) 'संत साहित्याचे मानवी जीवनातील महत्त्व' या विषयावर व्याख्यान व स्वच्छता दिंडी
छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)-नाथषष्ठी निमित्त पैठण येथे गुरुवार दि.२० रोजी सकाळी ९ वा.महसूल प्रशासन व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘संत साहित्य आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. सुनिल सोनगिरे व
डॉ. सुभ्स्ष महाराज खेत्रे आचार्य संतपीठ पैठण
तसेच शशीकांत घेर हे आपले विचार मांडतील कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन उपविभागीय
अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार दत्ता भारस्कर यांनी केले आहे. तसेच सकाळी ७ वा.
जिल्हाधिकारी स्वामी यांच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालय येथून स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे.
०००००
Comments
Post a Comment