अल्पवयीन मुलगा बेपत्ता
छत्रपती संभाजीनगर,दि.२१(जिमाका)-जवाहर नगर येथील रहिवासी असलेला एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला असल्याची तक्रार प्रभाकर चांदोजी जाधव यांनी जवाहर नगर पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे. फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा प्रशिक प्रभाकर जाधव (वय १७ वर्षे) हा बेपत्ता झाला आहे. दि.१८ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारापासून तो चेतक घोडा अग्निहोत्री चौक येथून गायब झाला आहे. त्याचा शोध घेण्यात आला असता तो मिळून आला नाही. प्रशिक याचे वर्णन खालील प्रमाणे – रंग सावळा, गालावर मस, केस - काळे वाढलेले, अंगात –ब्लु कलरचे टि शर्ट, व नेव्ही ब्लू कलरची नाईट पँन्ट, मराठी, हिंदी भाषा बोलता व लिहिता येते. वरील वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरीत जवाहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करणात आले आहे.
०००००
.jpg)
Comments
Post a Comment