जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी १० वी परीक्षा केंद्राची केली संयुक्त पाहणी

 












छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका):- इयत्ता १० वी अर्थात माध्यमिक शालांत परीक्षा सध्या सुरु आहेत. आज इयत्ता १० वी चा गणिताचा पेपर होता. आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी संयुक्तपणे फुलंब्री येथील संत सावता गुरुकूल विद्यालयातील परीक्षा केंद्राची पाहणी केली. संत सावता विद्यालयात जाऊन तिनही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी असलेली व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, पिण्याच्या पाण्याची सुविधा इ. बाबींची तसेच प्रत्यक्ष परीक्षा हॉल मध्ये जाऊन पेपर सुरु असतांना पाहणी केली. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असून त्यादृष्टीनेही पाहणी करण्यात आली.

            त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाथरी येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय येथे तर जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी कोलते टाकळी येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालय या ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा