अल्पवयीन मुलगा बेपत्ता

 छत्रपती संभाजीनगर, दि.24 (जिमाका)- भगतसिंगनगर वाळूज ता.गंगापूर येथील रहिवासी असलेला अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिरा सुभाष काते यांनी पोलीस ठाणे वाळूज (शहर ) येथे नोंदवली आहे. फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा सुरेश सुभाष काते (वय 17 वर्षे) हा बेपत्ता झाला आहे. दि.6 ऑक्टोंबर 2024 रोजी दुपारी 12 वा. घरात कटींग करायचे आहे असे सांगून गेला; तो घरी परत आला नाही. त्याचा शोध त्या परिसरात घेतला तरी तो मिळून आला नाही. सुरेश याचे वर्णन खालील प्रमाणे रंग सावळा, केस काळे, बांधा – सडपातळ, उंची 5 फूट अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पँट, पायात सँडल, भाषा मराठी हिंदी बोलता येते. वरील वर्णनाचा मुलगा आढळल्यास त्वरीत पोलीस ठाणे वाळूज (शहर) येथे संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा