जागतिक ग्राहक हक्क दिनःशुक्रवारी (दि.२१) विशेष कार्यक्रम
छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक हक्क दिन (दि.१५ मार्च) निमित्त शुक्रवार दि.२१ रोजी सकाळी साडे अकरा वा. जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्स्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे राहणार असून विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुरवठा डॉ. अनंत गव्हाणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. प्रमुख मार्गदर्शन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शिल्पा डोल्हारकर या करणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगिता राठोड तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व अशासकीय सदस्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती भारती वाकोडे यांनी केले आहे.
०००००
Comments
Post a Comment