जागतिक ग्राहक दिन कार्यक्रम: प्रत्येक दिवशी ग्राहकाने सजग राहणे गरजेचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 





छत्रपती संभाजीनगर, दि.२१(जिमाका)- आपण प्रत्येक जण दररोज, प्रत्येक क्षणी ग्राहक असतो. अशावेळी ग्राहक म्हणून आपली फसवणूक टाळण्यासाठी प्रत्येक दिवशी ग्राहकाने सजग राहणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

जागतिक ग्राहक दिन (दि.१५ मार्च) निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित,  जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती शिल्पा डोल्हारकर, अपर जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन अनित मैत्रे, मोटार वाहन निरीक्षक संगिता पवार, उपजिल्हाधिकारी श्रीमती संगिता राठोड, सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती भारती वाकोडे आदी तसेच ग्राहक परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  प्रवीण फुलारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सायबर पोलीस दलाचे गणेश घोरपडे यांनी यावेळी सायबर गुन्हेगारी व त्याद्वारे होणारे फसवणूकीचे प्रकार या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, आपण खरेदी करीत असलेली वस्तू, तिची गुणवत्ता, उपयुक्तता, विक्री पश्चात सेवा इ. बाबत तपास्णी कशी करावी याविषयी ग्राहकांनी एकमेकांना मार्गदर्शन करावे. यातुनच ग्राहक चळवळ बलवान होईल.

त्यानंतर शिल्पा डोल्हारकर यांनी ग्राहक हक्क कायद्याविषयी माहिती  देऊन उपस्थितांचे प्रबोधन केले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा