भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शनिवार (दि.१५) पर्यंत मुदतवाढ

            छत्रपती संभाजीनगर, दि.७ (जिमाका):-सहायक आयुक्त, समाजकल्याण, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या  योजनेतंर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता ११ वी व त्यापुढील व्यावसायीक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना घरभाडे व इतर खर्च भार्गावण्यासाठी अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते.  सन २०२४-२५ या शैक्षणीक वर्षापासून ही योजना ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून त्यासाठी संबंधीत विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची मुदत शनिवार दि.१५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच यापुर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक खात्याचा तपशील भरण्याकरीता टॅब उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रदीप भोगले यांनी केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा