पैठण येथे स्वच्छता दिंडीतून केला जागर

 







छत्रपती संभाजीनगर,दि.२०(जिमाका)-नाथषष्ठीनिमित्त आज पैठण येथे स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करुन दिंडी रवाना करण्यात आली. पैठण पंचायत समितीच्या आवारातून दिंडी काढण्यात आली. तहसिलदार दत्ता भारस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र देसले, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद, माहिती व संवाद तज्ञ डॉ संजय वाघ आदी उपस्थित होते. पैठण शहरातील प्रमुख मार्गांवरुन ही दिंडी नेऊन त्याद्वारे स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दि.21 रोजी पूर्व परीक्षा; 46 केंद्रांवर 14 हजार 784 उमेदवारांची व्यवस्था

पत्रपरिषदः वेरुळ अजिंठा महोत्स; फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस (दि.2,3 व 4)पर्वणी

विशेष लेखः- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम): महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाचा कणा