गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना: प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरावर परिपूर्ण नियोजन करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- उन्हाळ्यात जलसाठ्यांमधील गाळ काढणे व तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकून शेताची सुपिकता वाढविण्यासाठी गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार हे अभियान राबविण्यात येते. या अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर परिपूर्ण नियोजन करा. त्यासाठी गुरुवार दि.२० रोजी प्रत्येक तालुक्यात बैठक घेऊन नियोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हास्तरीय
समितीची बैठक झाली. बैठकीस उपजिल्हाधिकारी रोहयो उमाकांत पारधी, जिल्हा जलसंधारण
अधिकारी नरेंद्र कटके, तसेच भारतीय जैन संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष ॲड. गौतम संचेती,
राज्य महासचिव प्रवीण पारख, जिल्हा प्रकल्प प्रमुख किशोर ललवाणी, पारस बागरेचा, जिल्हाध्यक्ष
राजेंद्र पगारिया, अभिजीत हिरप आणि गौतम भंडारी यांची उपस्थिती होती. तसेच सर्व
उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आदी दुरदृष्य
प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
०००००




Comments
Post a Comment